• शुक्र. नोव्हेंबर 8th, 2024

मिली’चा टिझर आऊट:जान्हवी कपूर दिसणार नर्सच्या भूमिकेत, 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार चित्रपट

Byनिस्सीम काणेकर

ऑक्टोबर 12, 2022

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी ‘मिली’ या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर इतर चित्रपटांना टक्कर देण्यास सज्ज झाली आहे. टिझरपूर्वी 12 ऑक्टोबरला ‘मिली’ चित्रपटाचा फर्स्ट लूक जान्हवीने शेअर केला होता. जान्हवीचे वडील बोनी कपूर यांच्यासोबतचा तिचा पहिला व्यावसायिक प्रोजेक्ट आहे. या चित्रपटात सनी कौशलही मुख्य भूमिकेत आहे.

सर्वायव्हर-थ्रिलर चित्रपट म्हणून ओळखला जाणारा ‘मिली’ हा चित्रपट 2019 मल्याळम चित्रपट ‘हेलन’चा रिमेक आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते मथुकुट्टी झेवियर दिग्दर्शित या चित्रपटात मनोज पाहवा देखील आहेत. या चित्रपटात जान्हवी नर्सच्या भूमिकेत आहे. जी सुपरमार्केटच्या फ्रीझरमध्ये बंद होते.

आज जान्हवीने सोशल मीडियावर फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला आहे. ‘मिली’ ही बीएससी नर्सिंग पदवीधर असल्याची ओळख तिने फर्स्ट लूकमधून दिली आहे. “1 तासात तिचे आयुष्य बदलणार आहे… मिली,” असे जान्हवीने पोस्टला कॅप्शन दिले.

जान्हवीने शेअर केलेल्या दुसर्‍या पोस्टरमध्ये ती खूपच घाबरलेली दिसत आहे आणि पोस्टरमध्ये लिहिले आहे, “गोठली पण हलली नाही”.

हा चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.