• गुरू. मार्च 28th, 2024

चितांजनक! राज्यातील कोरोना रुग्णांचा आकड्यात वाढ, सर्वाधिक पॉझिटिव्ह कोणत्या जिल्ह्यात?

Byगौरव नाटेकर

जुलै 18, 2021

राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ झाली आहे.

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होती. मात्र त्यात आज वाढ झालीय. तसेच कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आज (18 जुलै) राज्यात एकूण 9 हजार कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे.

तर 5 हजार 756 जण कोरोनामुक्त झालेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यात एकूण 59 लाख 80 हजार 350 जण आतापर्यंत कोरोनातून बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा 96.24% इतका झालाय. (maharashtra has reported today 18 july 2021 9 thousand new corona positive patients cases)

दिवसभरात एकूण 180 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर हा 2.04% इतका झालाय. राज्यात सध्या 5 लाख 67 हजार 585 व्यक्ती होम क्वारटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 66 व्यक्ती संस्थात्मक विलिगिकरणात आहेत. राज्यात एकण1 लाख 3 हजार 486 सक्रीय रुग्ण आहेत.