• शुक्र. जून 21st, 2024

Maharashtra Corona Update : राज्यावर कोरोनाचा धोका कायम, आज इतक्या रुग्णांची वाढ

राज्यासह मुंबईवर असलेलं कोरोनाच सावट (Maharashtra Corona Update) कमी होण्याच नाव घेत नाहीये.

मुंबई : राज्यासह मुंबईवर असलेलं कोरोनाच सावट (Maharashtra Corona Update) कमी होण्याच नाव घेत नाहीये. राज्यात गेल्या काही दिवसांची आकडेवारी पाहता सातत्याने 1 हजारांपेक्षा कमी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. रविवारच्या तुलनेत आज राज्यामध्ये किंचीतशी घट झाली आहे. मात्र कोरोनाचा धोका हा कायम आहे. (maharashtra corona update 6 june 2022 today 1 thousand 36 positive patient found in state)

रविवारी राज्यात 1 हजार 494 रुग्ण कोव्हिड पॉझिटिव्ह सापडले होते. तर एकाचा मृत्यू झाला होता. मात्र आज रविवारच्या तुलनेत कमी पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात आज एकूण 1 हजार 36 रुग्ण आढळले आहेत. तर आज सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसेच 374 जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख, 38 हजार 938 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा 98.03 टक्के इतका झाल आहे. तर सध्या एकूण 7 हजार 429 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.