• शुक्र. जून 21st, 2024

Tauktae चक्रीवादळाने कोकणात इतक्या कोटींचे नुकसान, कोकण विभागीय आयुक्तांचा सरकारला अहवाल सादर

Cyclone Tauktae : चक्रीवादळाने कोकण (Konkan) किनारपट्टीजवळील गावांना जोरदार तडाखा दिला. अनेकांच्या घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी झाडे कोसळलीत.

मुंबई : Cyclone Tauktae : चक्रीवादळाने कोकण (Konkan) किनारपट्टीजवळील गावांना जोरदार तडाखा दिला. अनेकांच्या घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी झाडे कोसळलीत. तर आंबा, नारळ बागायतीचे मोठे नुकसान झाले. शेतीबरोबरच जनावरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाले. तर अनेक गावातील विद्युत खांबही कोसळल्याने काही दिवस अंधारात राहाे लागले होते. Tauktae चक्रीवादळाचा तडाखा सर्वात जास्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला बसला. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्त ( Konkan Divisional Commissioner ) यांनी कोकणातील वादळग्रस्तांच्या मदतीसाठी 47 कोटी 15 लाख रुपयांचीची मागणी मदत व पुनर्विकास विभागासाठी केली आहे. (Cyclone Tauktae causes loss of Rs 47.15 crore in Konkan)

कोकण विभागीय आयुक्तांनी Tauktae चक्रीवादळानंतर केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यानंतर ही मागणी केली आहे. एकूण मागणी 47 कोटी 15 लाख रुपयांचा पंचनामा अहवाल राज्य सरकारकडे (Maharashtra Government) सादर करण्यात आला आहे. यामध्ये मनुष्यहानीसाठी 41.20 लाख रुपये, पशूधन नुकसान 6.20 लाख, घरगुती वस्तू व कपडे – 11.29 लाख रुपये, घरांची पडझड 25 कोटी 24 लाख, जनावर गोठ्या – 34.84 लाख, मत्स्य व्यावसायिक- 4 कोटी 49 लाख आणि शेतीचे 16 कोटी 48 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणासाठी वादळग्रस्तांच्या मदतीसाठी 47 कोटी 15 लाख रुपयांची मागणी मदत व पुनर्विकास विभागासाठी करण्यात आली आहे.

दरम्यान, कोकणातील नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांकडूनही पाहणी करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही काही ठिकाणची पाहणी केली. तसेच महाविकास सरकारधील मंत्री यांनीही पाहणी दौरे केलेत. तसेच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनीही पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर कोणतीही मोठी घोषणा न करता मदत योग्य प्रकारे मिळेल, अशी ग्वाही दिली आहे.