• मंगळ. एप्रिल 16th, 2024

केंद्राच्या निर्णयानंतर राज्यात पेट्रोल 6.25 रूपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

Byनिस्सीम काणेकर

नोव्हेंबर 5, 2021

राज्यातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी, केंद्राच्या निर्णयानंतर इंधन आणखी स्वस्त होण्याची शक्यता

मुंबई : केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत. मात्र त्यासोबत राज्यातल्या जनतेसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात पेट्रोल 6.25 रूपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहेत. तर डिझेलचे दर 12.10 रूपयांनी कमी होऊ शकतात. केंद्राने एक्साईज ड्युटी कमी केल्यानं इंधनाच्या दरावरील राज्याचा कर आपोआप कमी होईल. त्यामुळे पेट्रोल सव्वा रूपयानं आणि डिझेल 2 रूपयांनी स्वस्त होऊ शकतं.

केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या केंद्राने करकपात केल्यावर गोव्यानेही इंधन करात कपात केलीय. गोव्यात केंद्राच्या करांव्यतिरिक्त सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या करात 7 रूपये कपात केली. यामुळे गोव्यात डिझेल 17 रूपयांनी तर पेट्रोल 12 रूपयांनी स्वस्त झालं. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने देशवासियांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीतून जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरची एक्साईज ड्यूटी कमी केली आहे. यामुळे पेट्रोल 5 रूपयांनी तर डिझेल 10 रूपयांनी स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.

देशात गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 115 वर तर दिल्लीत पेट्रोल 107.94 इतकं आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव 106.62 रुपयांवर तर दिल्लीत डिझेल 98.42 रुपये इतकं आहे.