• गुरू. ऑक्टोबर 10th, 2024

ICC Ranking: भारताचा सूर्या पुन्हा तळपला, टी20 क्रमवारीत आपापर्यंतची मोठी झेप

Byडियाना दीया

ऑक्टोबर 5, 2022

ICC T20 क्रिकेट क्रमवारी जाहीर, सूर्यकुमार यादवची मोठी झेप

टीम इंडियाचा सूर्या पुन्हा एकदा तळपला आहे. टी20 क्रमवारीत सूर्यकुमार यादवने मोठी झेप घेतली आहे. 2022 हे वर्ष खऱ्या अर्थाने सूर्यकुमार यादवचं ठरलं आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत सूर्यकुमारने दमदार कामगिरी केली आहे. याच जोरावर त्याने टी20 क्रमवारीत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ICC टी20 क्रमवारीत (ICC T20 Ranking) पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान पहिल्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकापासून अवघ्या 16 अंकांनी दूर आहे.

मोहम्मद रिझवानच्या खात्यात 854 अंक जमा आहेत. तर नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत दोन अर्धशतकं झळकावणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या खात्यात 838 अंक जमा आहेत.

सूर्यकुमार यादवचा झंझावात
सूर्यकुमार यादवने 2022 या वर्षात आपला झंझावात कायम राखला आहे. 16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत अव्वल स्थान मिळवण्याची संधी सूर्यकुमार यादवकडे आहे. पण त्याला पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानची कडवी झुंज आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील सात सामन्यात रिझवानने 316 धावा केल्या.

क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान
सूर्यकुमार यादवने टी20 क्रिकेटमधलं सर्वोत्तम स्थान गाठलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमारकेवळ 8 धावांवर बाद झाला. अन्यथा तो टी20 क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानाचा दावेदार ठरला असता. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.

भारताचा सलामीवीर केएल राहूलने सात अंकांची कमाई करत क्रमवारीत चौदाव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक 12 स्थानावर पोहोचला आहे. तिसऱ्या टी20 सामन्यात दमदार शतक करणारा दक्षिण आफ्रिकेच्या रिले रिसॉने थेट विसाव्या स्थानावर धडक मारलीय.